Ad will apear here
Next
आयर्नमॅन स्पर्धेत डॉ. अभय लुने यशस्वी
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे गौरव
डॉ. अभय लुनेपिंपरी :  येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्ररोग शल्य चिकित्सक डॉ. अभय लुने यांनी नुकतीच झुरिच (स्वित्झर्लंड) येथे झालेली ‘आयर्नमॅन २०१९’ स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या आठ भारतीयांमध्ये त्यांनी तिसरा क्रमांक मिळवला. जगातील अत्यंत कठीण स्पर्धांमध्ये या स्पर्धेचा समावेश होतो. या स्पर्धेत ३.८ किमी जलतरण, त्यानंतर १८० किमी सायकलिंग आणि  शेवटी ४२ किमी धावणे या तीन प्रकारांचा समावेश होता. ही स्पर्धा १६ तासांच्या आत पूर्ण करणे अपेक्षित होते. डॉ. लुने यांनी १४ तास ३२ मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण केली. 

जगभरातील एकूण दोन हजारांहून अधिक स्पर्धक यात सहभागी झाले होते. भारतातून वीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी आठ स्पर्धक ही स्पर्धा पूर्ण करू शकले. त्यात डॉ. लुने यांनी भारताच्या क्रमवारीत तिसरा क्रमांक मिळविला. ४५ ते ४९ वर्षे वयोगटात त्यांनी २११वे स्थान प्राप्त केले.

‘डॉ. अभय लुने यांनी झुरीच येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत मिळविलेले यश फारच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटतो. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील खेळाडू विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणास्रोत आहेत. या स्पर्धेत भाग घेणारे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील ते एकमेव प्राध्यापक आहेत,’ अशा शब्दात महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील व उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील, कोषाध्यक्ष व ट्रस्टी यशराज पाटील यांनी डॉ. अभय लुने यांचे अभिनंदन केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


डॉ. अभय लुने यांनी आतापर्यंत मुंबई मॅरेथॉन, लडाख मॅरेथॉन, सातारा हिल मॅरेथॉन, कोल्हापूर हाफ आयर्नमन अशा स्पर्धेत भाग घेतला असून, गिर्यारोहणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा त्यांचा मानस आहे. आयर्नमॅन स्पर्धेतील यशाचे सारे श्रेय त्यांनी कुटुंबीय, मित्र व सहकारी यांना दिले आहे. प्रशिक्षक सुनील मेनन यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZWJCD
Similar Posts
कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांचा डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाकडून सन्मान पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थीरोग व क्रीडा चिकित्सा विभागाच्यावतीने क्रीडा चिकित्सा विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व ‘कॉमनवेल्थ गेम्स २०१७’मधील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे ट्रस्टी कोषाध्यक्ष डॉ
स्वित्झर्लंडला भारतीय पर्यटकांची वाढती पसंती पुणे : ‘स्वित्झर्लंडमध्ये पर्यटनासाठी अनेक पर्याय उपलब्ध होत असल्याने स्वित्झर्लंडला भारतीय पर्यटकांची संख्या वाढत आहे. एरवी रोमँटिक डेस्टीनेशन म्हणून लोकप्रिय असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये साहसी पर्यटन, खाद्य संस्कृती, नवीन स्थळे लोकांसमोर आणण्याचा स्वित्झर्लंड टुरिझम प्रयत्न करत आहे.
पिंपरी येथे स्तन कर्करोगाविषयी परिषद उत्साहात पिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रेडिओ डायग्नोसिस विभाग व ब्रेस्ट इमेजिंग सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालात स्तन कर्करोगाविषयी परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
अवयवदानाच्या ऑनलाइन मोहिमेला प्रतिसाद पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान जनजागृती मोहिमेअंतर्गत नऊ ऑगस्ट रोजी अवयवदानाची ऑनलाइन मोहीम राबविण्यात आली व अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात आली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language